3G, 4G, 5G म्हणजे काय? | what is 3G, 4G, 5G in Marathi

1G, 2G, 3G 4G व 5Generation म्हणजे काय?

मित्रांनो आपण 1G, 2G, 3G आणि 4G ऐकत आलो आहोत आणि आता आपल्याला 5G Technology ऐकायला मिळत आहे. यातील G म्हणजे Generation म्हणजेच मराठीत पिढी म्हणता येईल. म्हणून पहिली पिढी-1G, दुसरी पिढी-2G, तिसरी पिढी-3G  व चौथी पिढी-4G  आणि आता पाचवी पिढीतील 5G तंत्रज्ञान येत आहे. अर्थात वापरत असलेल्या तंत्रज्ञानामध्ये आणखीन संशोधन होऊन जे नवीन तंत्रज्ञान तयार केले जाते ते नवीन पिढीमध्ये गणले जाते. आधुनिक तंत्रज्ञान म्हणून उदयास येते. आपल्या देशात नवनवीन तंत्रज्ञान निर्माण होत आहे. नुकतेच JIO ने 5G technology वर कामही सुरु केलेले आहे.

3G 4G 5G Marathi
3G 4G 5G Marathi

 3G- Third Generation

3G हे एक Third-Generation Cellular Data Technologies चे एकत्रीकरण आहे. जे 2G आणि 2.5G GPRS नेटवर्क मध्ये सुधारणा केली गेली यालाच 3G असे म्हटले गेले. 1982 मध्ये 1G- first generation उदयास आली तर 1990 मध्ये 2G- second generation ची cellular data technologies उदयास आली. त्यानंतर 2001 सुमारास 3G technologies ला विकसित केले गेले. परंतु 2007 मध्ये 3G लोकांमध्ये लोकप्रिय झाली.

कोणत्याही 3G डिव्हाईस मध्ये जेव्हा त्याचा cellular data transfer हा एका मोठ्या संचामध्ये(set of specifications) असतो यालाच International Telecommunications Union यांच्याद्वारे IMT-2000  असे म्हटले जाते. म्हणजेच 3G चा डेटा ट्रान्स्फर रेट हा कमीतकमी 2 Mbps असला पाहिजे, परंतु हा 3G चा डेटा ट्रान्स्फर रेट जवळजवळ 14.4 Mbps मिळू शकतो.

4G- Fourth Generation

4G हे एक Fourth Generation Cellular Data Technologies चे एकत्रीकरण आहे.

3G नंतरचे यशस्वी असलेले नेटवर्क 4G आहे. याला IMT-Advanced किंवा  International Mobile Telecommunications Advanced असे म्हटले जाते.

4G नेटवर्क दक्षिण कोरियात २००५ मध्ये वापरासाठी उपलब्ध झाले होते. त्यावेळी या नेटवर्क ला WiMAX असे म्हटले जात होते. त्यांनतर पुढील काही वर्षात युरोपीय देशांमध्ये उपलब्ध करण्यात आले. २००९ च्या सुमारास  United States मध्ये Sprint नावाचा पहिला 4G cellular network उदयास आला होता. 4G चा डेटा ट्रान्स्फर रेट हा 3G पेक्षा जास्त पटीने आहे. 4G चा डेटा ट्रान्स्फर डाऊनलोड आणि अपलोड हा जवळजवळ 100 Mbps पर्यंत मिळू शकतो. WiMAX, Sprint, LTE (Long Term Evolution) हे काही लोकप्रिय 4G technology आहेत.

 5G- Fifth Generation

सध्याच्या काळात इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. सध्या संपूर्ण देशात अगदी गाव- पाड्यात सुद्धा इंटरनेट वापरण्याचे प्रमाण वाढलेले आहे. भारत सरकारने संपूर्ण देशात ‘डिजिटल इंडिया- Digital India’ ही संकल्पना आणून जास्तीत जास्त सरकारी कार्यालयांमधील सर्व प्रकारची कामे आता डिजिटल स्वरूपात म्हणजेच इंटरनेट-Internet च्या मदतीने करायला सुरुवात केलेली आहे. हे सर्व व्यवहार करण्यासाठी 3G, 4G अशा technology चा सध्या आपण वापरत करीत आहोत, त्यातच आता हळूहळू 5G Technology वाटचाल करत आहे. मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण 5G नेटवर्कशी संबंधित सर्व माहिती पाहणार आहोत.

5G Network / 5G technology काय आहे?

5G Technology ही दूरसंचार टेक्नोलॉजी शी संबंधित आहे. 5G Technology या नवीन तंत्रज्ञानात रेडिओ लहरी-Radio Waves आणि विविध प्रकारच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी Radio वापरल्या जातात. दूरसंचार क्षेत्रात आतापर्यंत आलेल्या सर्व तंत्रज्ञानाच्या तुलनेत 5G तंत्रज्ञान अतिशय नवीन आणि जलद तंत्रज्ञान आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा अंतिम स्वरूप ITU म्हणजेच International Communication  Union ने निश्चित केला आहे. 4G Technology च्या तुलनेत हे तंत्रज्ञान पुढील पिढीचे म्हणजेच तंत्रज्ञान 5G चे आहे आणि आतापर्यंत हे सर्वात जलद असणारे तंत्रज्ञान आहे. 5G- Fifth Generation- मोबाईल नेटवर्क ची ही पाचवी पिढी आहे. यामध्ये जास्त bandwidth आणि advanced antenna technology असल्या कारणाने खूप मोठ्या प्रमाणात data हा wireless च्या माध्यमातून ट्रान्स्फर केला जात. 4G नंतर आता येणारा हा नेटवर्क आहे.

5G भारतात कधी सुरु होणार (5G Launched)

जागतिक पातळीवर सहाव्या क्रमांकावर सर्वात श्रीमंत असणारी व्यक्ति मुकेश अंबानी यांनी घोषणा केली होती की. २०२१ च्या अखेर पर्यंत भारतात 5G तंत्रज्ञान सुरु होईल. त्यानुसार त्यांची JIO कंपनी कार्यरत आहे. हे तंत्रज्ञान सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि  सुलभ आणि स्वस्त मिळण्यासाठी प्रयत्न असणार आहे असे अंबानी यांनी व्यक्तव्य केले होते.

5G चे फायदे

  • 5G च्या मदतीने औद्योगिक क्षेत्रातील उपकरणे आणि प्रोसेसिंग युटिलिटी, कम्युनिकेशन यामध्ये कमालीची गती वाढणार आहे. तसेच ऑटोमोबाईलच्या जगतात सुरक्षा देखील पूर्वीपेक्षा अधिक पटीने विकसित आणि उत्तम होईल.
  • 5G तंत्रज्ञानामुळे सुपर हाय स्पीड इंटरनेटची कनेक्टिव्हिटी केली जाईल. त्यामुळे या क्षेत्राचा जलद गतीने कनेक्टिव्हिटी होऊन विकास प्राप्त होईल.
  • 5G मुळे, ड्रायव्हरलेस उपकरणे, आरोग्य विभागातील विविध सेवा, ऑनलाइन सेवा इत्यांदिमध्ये  अधिक गती प्राप्त होऊन सुलभ होतील.

5G नेटवर्क ची वैशिष्ट्ये

5G नेटवर्क ची गती (5G Network Speed)

या तंत्रज्ञानाचा वेग सुमारे प्रती सेकंदाला सेकंदात 20GB पर्यंत डेटा ट्रान्स्फरचा वेग मिळू शकेल. त्यामुळे तंत्रज्ञानाशी संबंधित सर्व कामे झपाट्याने होतील व अतिशय वेगाने आणि सहजपणे करता येतील.

इंटरनेटच्या गतीत वाढ( Fast Internet Speed)

सध्या आपण 4G नेटवर्क वापर असताना एका सेकंदाला सुमारे 1GB ची फाईल डाउनलोड करण्याची क्षमता आहे तर 5G नेटवर्क मुळे आपल्याला एका सेकंदाला सुमारे 10GB किंवा त्याहून अधिक फाईल डाउनलोड करण्याची क्षमता प्राप्त होईल.

डिजिटल इंडिया क्षेत्रात वेग (Growth Speed in Digital India)

5G नेटवर्कमुळे देशातील डिजिटल इंडियाला चांगली गती प्राप्त होईल आणि देशाच्या विकासातही वेग होईल.

जीडीपी वाढीमध्ये वेग (GDP Growth Speed)

या नवीन तंत्रज्ञानामुळे आपल्या देशाच्या जीडीपी मध्ये आणि अर्थव्यवस्थेवर बरेच सकारात्मक परिणाम होऊ शकतात. असे अलीकडेच आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेने दावा केलेला आहे.

5G नेटवर्क चे तोटे

  • तांत्रिक संशोधक व तज्ञांना संशोधनात असे आढळून आले की 5G तंत्रज्ञानाच्या लहरी भिंतींना भेदण्यास असमर्थ आहेत. यामुळे त्याची घनता फार दूरवर जाऊ शकत नाही आणि याचा परिणाम म्हणून त्याच्या नेटवर्कमध्ये कमकुवतपणा येवू शकतो. याशिवाय
  • याशिवाय पाऊस, झाडे आणि वनस्पतींसारख्या नैसर्गिक संसाधनांमध्ये प्रवेश करण्यासही असमर्थ असल्याचे संशोधकांचे मत आहे, त्यामुळे नेटवर्कमध्ये समस्या निमार्ण होऊ शकते.
  • सध्या कोरोना महारामारी मध्ये बर्‍याच सामान्य लोकांचा असा समज आहे ही, 5G तंत्रज्ञानाच्या किरणांमुळे  मानवावर घातक परिणाम होत आहे व हाच एक कोरोना व्हायरस आहे असा समज आहे  परंतु अद्याप या संदर्भात कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.

वरील ब्लॉग मध्ये आपण 5G नेटवर्क शी सबंधित नवीन तंत्रज्ञाना बद्दल थोडक्यात माहिती पाहिली आहे. सदर माहितीमुळे आपणास 5G Network/ Technology बद्दल समजले असेलच. या माहितीबद्दल आपला अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद..!

Leave a Comment