मुख्यमंत्री योजनादूत महामाहिती मराठी | Mukhyamantri Yojana Doot Mahamahiti in Marathi 2024

मुख्यमंत्री योजनादूत संपूर्ण माहिती मराठीमध्ये २०२४ | mahamahiti.com

मुख्यमंत्री योजनादूत महामाहिती मराठी | Mukhyamantri Yojana Doot Mahamahiti in Marathi 2024

नमस्कार मित्रांनो आज आपण योजना “मुख्यमंत्री योजनादूत” Mukhyamantri Yojana Doot Mahamahiti या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत राज्यात ५० हजार योजनादुतांची निवड करून त्यांना सहा(६) महिन्यांसाठी दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

Mukhyamantri Yojana Doot Mahamahiti महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे “मुख्यमंत्री योजनादूत” नावाने एक उपक्रम राबला जाणार आहे असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत जाहीर केलेले आहे. त्यानुसार योजनादूत या उपक्रमाअंतर्गत राज्यभरातील 50 हजार उत्स्तुक तरुणांना / उमेदवारांना “योजनादूत” म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमाअंतर्गत सरकारतर्फे प्रत्येक महिन्याला 10  हजार रुपये या प्रमाणे मानधन दिले जाणार आहे. हे मानधन सहा(६) महिन्यांसाठी असणार आहे. शासनाचे योजनादूत म्हणून काम करायचे असल्यास तर त्यासाठी अर्ज, कागदपत्रे, नियम अटी काय आहेत हे आपण या महामाहिती ब्लॉग मधून जाणून घेऊ या.

मुख्यमंत्री योजनादूत म्हणजे काय? 

Mukhyamantri Yojana Doot Mahamahiti  राज्य सरकार समाजातील विविध घटकांसाठी त्यांना मदत व्हावी, आर्थिक हातभार लागावा यासाठी शासनातर्फे वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. याच योजनांचा फायदा समाजातील प्रत्येक घटकाला मिळावा म्हणून सरकारतर्फे प्रयत्न केले जातात. म्हणजेच या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न केला जातो. या योजनांची माहिती गाव पाड्यांपर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी यावर काम करणे गरजेचे आहे. याच कामाची जबाबदारी “मुख्यमंत्री योजनादूंतावर” सोपवली जात आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती ही सामन्य जनतेपर्यंत पोचली पाहिजे, या योजनांची माहिती जनतेला देणे हे या योजनादूतांचं काम असणार आहे. या कामासाठी योजनादूतांना प्रतिमहा 10,000/-  हजार रुपये दिले जाणार आहेत. योजनादूतांसाठी हे मानधन सहा महिन्यांपर्यंत मिळणार आहे.

मुख्यमंत्री योजनादूत होण्याची पात्रता काय आहे? 

उमेदवार पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत.

  • उमेदवाराचे वय वर्षे १८ ते ३५ असणे आवश्यक आहे.
  • कोणत्याही शाखेचा पदवीधर (Graduate) व संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक आहे.
  • बँक खाते नंबर व आधार नंबर संलग्न (लिंक) असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री योजनादूतसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत.? 

Mukhyamantri Yojana Doot Mahamahiti  योजनादूत होण्यासाठी उमेदवाराला विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी आधारकार्ड, पासपोर्ट साईजचा फोटो, पदवी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वैयक्कित बँक खात्याचा तपशील, ही कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे. 

निवडीसाठी कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज
  • आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पदवी प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला (सक्षम यंत्रणेच्या सही शिक्क्यासह)

मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज कुठे करावा? 

Mukhyamantri Yojana Doot Mahamahiti  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवार दिनांक ७ सप्टेंबर २०२४ ते १३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

  • सदर अर्ज करण्यासाठी उमेदवाराला http://mahayojanadoot.org या वेबसाईट वर जाऊन उमेदवार आपला अर्ज भरू शकतात.
  • मुख्यमंत्री योजनादूत नोंदणी कालावधी : दि. ७ ते १३ सप्टेंबर, २०२४.

Leave a Comment