Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana Government of Maharashtra Mahiti in Marathi | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मराठी माहिती

Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana Government of Maharashtra Mahiti in Marathi | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मराठी माहिती

Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे सबलीकरण, त्यांच्या आरोग्य आणि त्यांच्या पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी पासून मान्यता दिलेली आहे. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील वय वर्षे २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला महिना रुपये १,५००/- असा आर्थिक लाभ Direct Benefit Transfer (DBT) द्वारे देण्यात येणार आहेत.

Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana Government of Maharashtra

आवश्यक लागणारी कागदपत्रे

■ Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana आवश्यक कागदपत्रे:

१. आधार कार्ड (अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे)

२. अधिवास प्रमाणपत्र, प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.

३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे (१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.

४. वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक,

अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.

ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.

५. नवविवाहितेच्या बाबतीत रेशनकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.

६. बँक खाते तपशील (खाते आधार लिंक असावे)

७. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो

Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojanaयोजनेचे उद्दिष्ट

■ Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana योजनेचे उदिदष्टः

१. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.

२. त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.

३. राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.

४. राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे.

५. महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.

योजनेचे स्वरूप

■ Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana योजनेचे स्वरुप :

प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात DBT द्वारे दरमहा रु.१५००/- इतकी रक्कम दिली जाईल.

योजनेचे लाभार्थी

■ Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana योजनेचे लाभार्थी :

महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.

योजनेची पात्रता

■ Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana पात्रताः

१. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.

२. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.

३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.

४. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

■योजनेचा अर्ज कुठे करायचा?

शासनाच्या ladakibahin.maharashtra.gov.in ह्या बेवसाईट वर Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana चा ऑनलाईन अर्ज करू शकतो.

■सारांश

Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमुळे राज्यातील महिलांचे सबलीकरण होत आहे, त्यांचे सक्षमीकरण होत आहे, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ह्या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र शासनाचा आहे. सर्व सामान्य महिलेला आर्थिक व्यवहार करण्याचे जे स्वातंत्र्य या योजनेमुळे मिळत आहे. कुटुंबातील आर्थिक बाबी हाताळण्यासाठी महिला सक्षम होताना दिसत आहेत. त्यांच्या राहणीमानामध्ये आणि त्याच्या पोषणामध्ये सुधारणा होत आहे.

■नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana


१. लाडकी बहीण योजना कोणासाठी आहे?

राज्यातील सर्व महिला वय वर्षे २१ ते ६५

२. लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र कुठे जमा करायची ?

लाडकी बहिण योजनेच्या वेबसाईटवर उपलोड करणे

३ बहीण माझी लाडकी योजना अर्ज कुठे करायचा?

ladakibahin.maharashtra.gov.in

४. लाडली बहना योजनेसाठी आपण ऑनलाइन अर्ज करू शकतो का?

होय

५. लाडकी बहीण म्हणजे कोणती बहिण?

महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला

६. लाडकी बहीण योजना मुलींसाठी आहे का?

नाही, वय वर्षे २१ ते ६५ साठी

Leave a Comment