तीन गॅस सिलिंडर मिळणार मोफत! मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना माहिती मराठी | Mukhyamantri Annapurna Yojana Mahiti Marathi Maharashtra

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना | Annapurna Yojana Mahiti Marathi:  मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने नंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेतील सुमारे ५२ लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

Mukhyamantri Annapurna Yojana Mahiti Marathi Maharashtra

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कोणासाठी आहे? ( Annapurna Yojana Mahiti Marathi )

  • ज्या महिलेच्या नावावर गॅस सिलेंडर जोडणी आहे. त्या महिला या योजनेस पात्र असतील.
  • पंतप्रधान उज्ज्वला योजनेसाठी पात्र असणा-या महिला लाभार्थी या योजनेस पात्र असतील.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असणाऱ्या महिला सुद्धा या योजनेस पात्र असतील.
  • या योजनेचा लाभ रेशन कार्डनुसार एका कुटुंबातील एकच महिला लाभार्थीला असणार आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज ( Annapurna Yojana Mahiti Marathi )

अन्नपूर्णा योजनेसाठी पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील पात्र महिला लाभार्थी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने मधील पात्र महिला लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत, म्हणून शासनाकडून सर्व पात्र महिला लाभार्थ्यांची यादी सबंधित गॅस सिलेंडर पुरवठा दाराकडे यादी प्रसिध्द केली जाण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस सिलेंडर पुरवठा दाराकडे जाऊन आधार प्रमाणीकरण (KYC) करणे गरजेचे असणार आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ ( Annapurna Yojana Mahiti Marathi )

  • पात्र महिला लाभार्थ्यांना एका वर्षात ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण (रिफील) करून मिळणार आहे. 
  • हे तीन गॅस सिलिंडरचे पुनर्भरण अगदी मोफत मिळणार आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या कोणकोणत्या अटी आहेत? ( Annapurna Yojana Mahiti Marathi )

  • महिलांच्या नावेच गॅस जोडणी असायला हवी.
  • एका कुटुंबात एकच महिला लाभार्थी सदर योजनेस पात्र असणार आहे.
  • एका महिन्यात एकच गॅस सिलेंडर मिळणार आहे.
  • पात्र महिला लाभार्थ्यांना एका वर्षात ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण (रिफील) करून मिळणार आहे. 
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
  • प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत पात्र असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

महत्वाच्या लिंक्स GR डाऊनलोड करा

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना GRDownload GR
ग्रुप जॉईन करा WhatsApp
ग्रुप जॉईन करा WhatsApp

Leave a Comment