महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२२ तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती…Maharashtra Police bharti 2022

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२२ ला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती: Maharashtra Police bharti 2022

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२२ ला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती:-

मुळात नोव्हेंबरमध्ये होणारी पोलिस भरती लांबणीवर पडली आहे. १ नोव्हेंबरपासून भरती प्रक्रिया सुरू होणार होती. राज्यभरात 14,956 जागांसाठी भरती होणार आहे. ते तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. नोकरभरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाईल. याशिवाय राज्य राखीव दल (SRPF) पोलीस भरतीलाही विलंब झाला आहे. Maharashtra State Police bharti 2022

Maharashtra Police bharti 2022
Maharashtra Police bharti 2022

उमेदवारांना पोलीस भरतीची तयारी सुरूच ठेवण्याचे आवाहन:

राज्य सरकारने पोलिसांची भरती तात्पुरती स्थगित  केली आहे. तरीही  पोलीस भरतीची  तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काळजी न करता तयारी सुरूच ठेवावी, असे पोलीस अधिकाऱ्यांनी आवाहन  केले आहे. सध्या  उशीर झालेला नोकर भरतीचा निर्णय पुढील काही दिवसांत  घेतला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासकीय कारणास्तव पोलीस  भरतीच्या जाहिरातींना स्थगिती देण्यात आली आहे. Maharashtra Police bharti 2022

पोलीस भरती वयोमर्यादा शिथिल होणार?

गेल्या तीन वर्षांत एकही पोलिस भरती झालेली नाही. वयोमर्यादेमुळे अनेकजण पोलीस  भरतीसाठी अपात्र ठरत आहेत. अशा तरुणांना संधी मिळायला हवी आणि त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. त्यामुळे ही पोलीस भरती अल्प कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचे आयोग व शासनाकडून समजते.  पुढील काही दिवसांत  पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल आणि यामध्ये  वयोमर्यादाही  शिथिल होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. Maharashtra State Police bharti 2022

पोलीस भरतीसाठी जिल्ह्यानुसार /विभागानुसार  एकूण  जागा:

  • मुंबई – 6740
  • ठाणे शहर – 521
  • पुणे शहर – 720
  • पिंपरी चिंचवड – 216
  • मिरा भाईंदर – 986
  • नागपूर शहर – 308
  • नवी मुंबई – 204
  • अमरावती शहर – 20
  • सोलापूर शहर- 98
  • लोहमार्ग मुंबई – 620
  • ठाणे ग्रामीण – 68
  • रायगड -272
  • पालघर – 211
  • सिंधूदुर्ग – 99
  • रत्नागिरी – 131
  • नाशिक ग्रामीण – 454
  • अहमदनगर – 129
  • धुळे – 42
  • कोल्हापूर – 24
  • पुणे ग्रामीण – 579
  • सातारा – 145
  • सोलापूर ग्रामीण  – 26
  • औरंगाबाद ग्रामीण- 39
  • नांदेड – 155
  • परभणी – 75
  • हिंगोली – 21
  • नागपूर ग्रामीण – 132
  • भंडारा – 61
  • चंद्रपूर – 194
  • वर्धा – 90
  • गडचिरोली – 348
  • गोंदिया – 172
  • अमरावती ग्रामीण – 156
  • अकोला – 327
  • बुलढाणा – 51
  • यवतमाळ – 244
  • लोहमार्ग पुणे – 124
  • लोहमार्ग औरंगाबाद -154
  • पोलीस भरती एकूण जागा – 14956  

पोलीस भरतीसाठी प्रवर्गानुसार एकूण  जागा

  • अनुसूचित जमाती – 1350
  • अनुसूचित जाती – 1811
  • विमुक्त जाती (अ) – 426
  • भटक्या जमाती (ब) – 374
  • भटक्या जमाती (क) -473
  • भटक्या जमाती (ड) – 292
  • विमुक्त मागास प्रवर्ग – 292
  • इतर मागास वर्ग – 2926
  • इडब्लूएस – 1544
  • खुला – 5468 जागा
  • पोलीस भरती एकूण जागा – 14956  Maharashtra State Police bharti 2022

Leave a Comment