महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET)  2021

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET)  2021

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 2021 साठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ची जाहिरात देण्यात आली आहे. D.Ed, B.Ed, B.P.Ed इत्यादी व्यावसायिक शिक्षण पूर्ण झालेल्या उमेद्वारांना ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे, याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात.

MAHATET
MAHATET

 

महाराष्ट्र TET 2021 साठी नोंदणी:-

महाराष्ट्रात शिक्षक भरतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET 2021 ) ची नोंदणी प्रक्रिया  दिनांक 3 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MAHATET-2021 साठी अधिकृत वेबसाइट mahatet  ला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करू शकतात. महाराष्ट्र TET 2021 ची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार दिनांक 25 ऑगस्ट रात्री 11.59 वाजेपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. दिनांक 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान अर्जदार त्यांचे प्रवेशपत्र (Hall Ticket) डाउनलोड करू शकणार आहेत. महाराष्ट्र टीईटी 2021 शी संबंधित महत्वाची माहिती आणि अधिसूचनेची थेट लिंक खाली दिली आहे.

MAHA TET अधिसूचना – येथे क्लिक करा.

MAHA TET बाबत महत्वाच्या तारखा:-

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात:- 3 ऑगस्ट 2021

अर्ज नोंदणीची शेवटची तारीख:- 25 ऑगस्ट 2021

प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख: 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2021

परीक्षा पेपर – I :-  10 ऑक्टोबर 2021 ( सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 )

परीक्षा पेपर – II :-  10 ऑक्टोबर 2021 ( दुपारी 2.00 ते 4.30 )

परीक्षेसाठी 10 लाखांहून अधिक उमेदवार असण्याची शक्यता:-

राज्यातील वर्ग 1 ते 8 पर्यंतच्या शिक्षकांच्या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येईल. ज्यामध्ये 10 लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी हजेरी लावणे अपेक्षित आहे. कौन्सिलने महाराष्ट्र टीईटी 2021 परीक्षेच्या वेळापत्रकाची नोटीस त्याच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली होती. तसेच  राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे याची माहिती देण्यात आली.

MAHATET 2021 साठी अर्ज कसा करावा?

पायरी 1 :-  अधिकृत वेबसाइट mahatet  ला भेट द्या

पायरी 2 :-  वेबसाईटच्या होम पेजवरील “नवीन नोंदणी(Registration)” या लिंकवर क्लिक करा.

पायरी 3 :-  नोंदणी करा आणि पोर्टलवर लॉग इन करा.

पायरी 4 :-  आवश्यक तपशील भरून अर्ज शुल्क भरा.

पायरी 5 :-  फॉर्म सबमिट करा आणि पुढील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

महाराष्ट्र TET 2021 बद्दल ची माहिती आणि ऑनलाईन फॉर्म भरणे यासाठी वरील ब्लॉग चा नक्की वापर झाला असेल. आपल्या मित्रांसोबत सुद्धा हा ब्लॉग शेयर करायला विसरू नका. धन्यवाद..!

Leave a Comment