विद्यार्थ्यांसाठी खुशखबर 10 वी ची गुणपत्रिका ४ जुलै पासून मिळणार

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर  ४ जुलै २०२२ पासून गुणपत्रिकेचे वाटप होणार

 इयत्ता १० वी मूळ गुणपत्रिका वाटपाबाबत:-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण अशा नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२२  मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेचा निकाल दिनांक १७ जून २०२२  रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरु झाली. परंतु दहावीची मूळ गुणपत्रिका अद्याप मिळाली नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांकडून सतत याबाबत सबंधित शाळांकडे विचारणा केली जात होती. विद्यार्थ्यांना दहावीची मूळ गुणपत्रिका येत्या ४ जुलै २०२२ रोजी मिळणार आहे, याबाबतचे पत्र मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

विभागीय मंडळाकडून शाळांना गुणपत्रिकेचे वाटप:-

‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ’ कडून इयत्ता दहावीच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना सोमवारी ४ जुलै २०२२ पासून देण्यात येणार आहेत. मार्च-एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता १० वी परीक्षेच्या गुणपत्रिका व तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप माध्यमिक शाळांना सोमवार दिनांक ०४/०७/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता विभागीय मंडळाकडून माध्यमिक शाळांना करावयाचे आहे व त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप माध्यमिक शाळांनी करावयाचे आहे असे मंडळाच्या प्रकटन करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.

शाळांकडून विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वाटप:-

विभागीय मंडळाकडून शाळांना गुणपत्रिकेचे वाटप झाल्यानंतर त्याच दिवशी म्हणजे सोमवार दिनांक ०४/०७/२०२२ रोजी दुपारी ३.०० वाजल्यापासून विद्यार्थ्यांना शाळा स्तरावरून गुणपत्रिकांचे वाटप करण्याचे नियोजन करावे.  येतील असे ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगिलते आहे.

सर्व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याना त्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा!!

mahamahiti.com
SSC Marksheet

 

 

 

Leave a Comment