IDBI बँकेत एकूण 920 जागांसाठी भरती 2021

IDBI बँकेत एकूण 920 जागांसाठी भरती 2021

IDBI BANK – इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (आयडीबीआय बँक लिमिटेड किंवा आयडीबीआय बँक किंवा आयडीबीआय) ची स्थापना 1964 मध्ये नवीन भारतीय उद्योगाच्या विकासासाठी क्रेडिट आणि इतर आर्थिक सुविधा प्रदान करण्याच्या कायद्याद्वारे करण्यात आली. ही एक विकास वित्त संस्था आणि जीवन विमा महामंडळाची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे.

IDBI BANK 2021
IDBI BANK 2021

आयडीबीआय (IDBI BANK) बँकेने 2021 मध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. बँकेने पात्र उमेदवारांकडून बँक कार्यकारी (एक्झिक्युटिव) या पदांवर कंत्राटी पद्धतीने देशभरातील विविध शाखांमध्ये नेमणूक करणार केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेतील एकूण पदांचा तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, परीक्षा शुल्क, ऑनलाईन प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

पात्र उमेदवार आयडीबीआय बँकेच्या idbibank अधिकृत वेबसाईट  वर जाऊन दिनांक 4  ऑगस्ट २०२१ ते 18 ऑगस्ट २०२१ या कालावधीत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. बँक कार्यकारी पदावरील उमेदवारांची नियुक्ती फक्त एका वर्षासाठी करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या कामगिरीवर त्यांचा कार्यकाळ पुढील दोन वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो.

एकूण पदे:-

एकूण 920 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.

UR

SC ST OBC EWS

TOTAL

373 138 69 248 92

920

 

वयोमर्यादा:-

उमेदवाराची वयोमर्यादा ही 20 ते 25 च्या दरम्यान असावे,  असे बँकेने त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये सांगितले आहे.

शैक्षणिक पात्रता:-

उमेदवारांनी मान्यता प्राप्त कोणत्याही विद्यापीठातून 55 टक्केंनी पदवी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तर,  आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 50 टक्क्यांची अट निश्चित करण्यात आलेली आहे.

परीक्षा शुल्क:-

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारासाठी अर्जाचे शुल्क 200 रुपये आहे,  इतर प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क 1000 रुपये भरावे लागणार आहे.

ऑनलाईन अर्ज कसा करावा:-

पायरी 1 :- आयडीबीआय idbibank बँकेच्या वेबसाईटला भेट द्या.
पायरी 2 :- मुखपृष्ठावर असणाऱ्या  करिअर या लिंकवर क्लिक करा.
पायरी 3 :- पुढे कार्यकारी कंत्राटी भरती 2021 वर क्लिक करा.
पायरी 4 :- अर्ज दाखल करण्यासाठी नवीन नोंदणी करा.
पायरी 5 :- नोंदणी केल्यानंतर आवश्यक माहिती भरा.
पायरी 6 :- आवश्यक माहिती भरल्यानंतर अर्ज दाखल करा.
पायरी 7 :- सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर परीक्षेचे फी भरा.
पायरी 8 :- अर्जाची प्रत डाऊनलोड करून पुढील संदर्भासाठी त्याची प्रिंट आऊट घेऊन सोबत ठेवा.

या पदासाठी वेतन किती मिळणार?

“कार्यकारी” पदासाठी देशभरातील विविध परीक्षा केंद्रावर 5 सप्टेंबर 2021 ला परीक्षा आयोजित केली जाणार आहे.  निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या वर्षी रु. 29,000/- दुसऱ्या वर्षी 31,000/- हजार तर तिसऱ्या वर्षी 34,000/- हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

 

1 thought on “IDBI बँकेत एकूण 920 जागांसाठी भरती 2021”

Leave a Comment