शेत जमीनीवर फळझाड लागवड योजना

शेत जमीनीवर फळझाड लागवड योजनेमार्फत अधिकाधिक क्षेत्रावर फळबाग लागवड करून रोजगार निर्मितीस प्रोत्साहन मिळावे व शेतक-यांचा बांधवांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शेत जमीनीवर फळझाड लागवड योजना राबविली जाते. चला तर या योजनेची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे समजून घेऊयात…

कोणत्या प्रवर्गासाठी योजना लागू आहे :
१) अनुसुचित जाती
२) अनुसुचित जमाती
३) दारीद्र रेषेखालील लाभार्थी
४) भु-सुधार योजनेचे लाभार्थी
५) इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
६) कृषि कर्ज माफी योजना 2008 नुसार अल्प भू-धारक व सीमांत शेतकरी

योजनेच्या प्रमुख अटी व नियम :
▪ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी जॉबकार्ड असणे आवश्यक आहे.
▪ ग्रामसभेमध्ये लाभार्थीची निवड होणे आवश्यक आहे.

कोणकोणती कागदपत्रे लागतील : लाभार्थींच्या नावावर असलेल्या जमिनीचा 7/12 उतारा व 8 अ उतारा. व लाभार्थींचे इतर वैयक्तिक महत्वाची कागदपत्रे

लाभाचे स्वरूप असे : वृक्षनिहाय मंजूर मापदंडानूसार 100 % दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील जिवंत झाडांच्या टक्केवारीप्रमाणे व 75 टक्के झाडे जिवंत असल्यास अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहिल.

संपर्क कुठे साधावा : संबधित मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये.

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी असल्यास सबंधित कार्यालयात खात्री करून घ्यावी.

Leave a Comment