महाराष्ट्र राज्य सरकारचा नोकर भरतीबाबत मोठा निर्णय, नोकरभरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर

महाराष्ट्र राज्य सरकारचा नोकर भरतीबाबत मोठा निर्णय, नोकरभरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर. Maharashtra state government Jobs, Big decision of Maharashtra state government jobs regarding job recruitment , good news for the youth who are preparing for job recruitment. 

महाराष्ट्र राज्य सरकारचा नोकर भरतीबाबत मोठा निर्णय

कोरोना व्हायरसच्या काळात सर्व काही थांबले होते. परिणामी सरकारी महसुली उत्पनात घट झाली होती. दुसरीकडे, स्वच्छता सुविधा उभारण्यासाठी मोठा खर्च येत होता. या सगळ्याचा परिणाम राज्य सरकारच्या अर्थव्यवस्थेवर होत होटा. यातून बाहेर येण्यासाठी  राज्य सरकारने नोकर भरतीवर  निर्बंध लादले होते.

Maharashtra Government Jobs
Maharashtra Government Jobs

सरकारी कर्मचारी भरती बंद झाल्यामुळे सध्या राज्यात 2,00,000 हून अधिक नोकऱ्या उपलब्ध आहेत. आता राज्य सरकारने सुरुवातीच्या टप्प्यात ७५,००० जागांसाठी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ठाकरे सरकारने घातलेले नोकरभरतीवरील निर्बंध शिंदे-फडणवीस सरकारने उठवले आहेत. Maharashtra state government Jobs, Big decision of Maharashtra state government jobs regarding job recruitment

नोकरभरतीवरील निर्बंध शिथिल केले.

कोविड-19 महामारीच्या काळातील  राज्य सरकारची 50% भरतीची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे आणि ती आता 100% पूर्ण केली जाईल. भरतीवरील निर्बंध उठवल्यामुळे सरकारी विभागांमधील 75,000 रिक्त पदे भरण्याच्या पहिल्या टप्प्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Maharashtra state government Jobs, Big decision of Maharashtra state government jobs regarding job recruitment.

विभागनिहाय होणारी भरती खालीलप्रमाणे असेल

  • आरोग्य खाते – 10,568
  • गृह खाते – 11,443
  • ग्रामविकास खाते – 11,000
  • कृषी खाते – 2500
  • सार्वजनिक बांधकाम – 8337
  • नगरविकास खाते – 1500
  • जलसंपदा खाते – 8227
  • जलसंधारण खाते – 2423
  • पशूसंवर्धन खाते – 1047

सरळसेवा कोट्यातील भरती

सुधारित आकृतीबंध अंतिम झालेल्या शासकीय विभागांना सरळसेवा कोट्यातील 100 टक्के रिक्त पदांची भरती करण्यास मान्यता देण्यात आली. सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झाला नसलेल्या विभागांतील गट ‘अ’, गट ‘ब’ आणि गट ‘क’मधील सरळसेवा कोट्यातील 80 टक्के रिक्त पदे भरण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. मात्र, वाहनचालक व गट ‘ड’ संवर्गातील पदांची भरती यातून वगळली आहे. Maharashtra state government Jobs, Big decision of Maharashtra state government jobs regarding job recruitment.

Leave a Comment