अग्निपथ योजना- अग्निवीर भरती २०२२ | Agnveer Bharti | Agniveer Army Recruitment 2022

अग्निपथ योजना- अग्निवीर भरती २०२२ | Agniveer Bharti 2022

Agnipath Scheme | Agnveer Bharti | Agniveer Army Recruitment 2022

ठाण्यात लष्कर भर्ती मेळावा | Agniveer Army Recruitment Rally Thane 2022

 अग्निवीर भरती २०२२(Agniveer Bharti 2022):

भारतीय नौदलात भरतीची तयारी करणाऱ्या इयता बारावी पास युवकांसाठी एक सुवर्णसंधी आलेली आहे. १ जुलै २०२२ पासून अग्निपथ योजने अंतर्गत अग्निवीर भरती २०२२  साठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया  १५ जुलै २०२२ नंतर सुरू होईल,  तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २२ जुलै २०२२ असणार आहे. या भरतीमध्ये एकूण २८०० अग्निवीर SSR पदांची भरती केली जाईल. यातील ५६० जागा महिलांसाठी असणार आहेत. भारतीय नौदल अग्निवीर भरतीबाबत संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे प्रमाणे पाहूयात.

अग्निवीर SSR २०२२ साठी शैक्षणिक पात्रता:-

भारतीय नौदल अग्निवीर SSR भरती २०२२ च्या परीक्षेचा अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतून इ.१२ वी उत्तीर्ण व संगणक, विज्ञान, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र इत्यादी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अग्निवीर SSR भरती २०२२ साठी लागणारी उंची:-

अग्निवीर भरतीसाठी पुरुषांची उंची १५७ सेमी आणि महिलांची उंची १५२ सेमी असणे अनिवार्य आहे.

अग्निवीर SSR भरती २०२२ साठी वयोमर्यादा:-

अग्निवीर भरतीसाठी उमेदवार हा किमान १७ वर्षे ६ महिने ते कमाल २३ वर्षे वयोमर्यादा असणार आहे.

अग्निवीर भरतीसाठी विवाहित व्यक्ती अर्ज करू शकतात का?:-

अग्निवीर भरतीसाठी फक्त अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारच अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. विवाहित व्यक्ती ह्या भरतीसाठी अर्ज करू शकत नाही.

अग्निवीर भरती झालेल्या किती दिवसांची सुट्टी मिळू शकते:-

अग्निवीर म्हणून भरती झालेला उमेदवारांना वर्षभरात ३० दिवसांची रजा दिली जाणार आहे. तसेच या कालावधीमध्ये आजारी असल्यास तशा सुट्ट्याही मिळणार आहेत.

अग्निवीरांना मानधन किती असेल:-

अग्निवीरचा पगार १ ल्या वर्षी ३०,०००/-,  २ –या वर्षी ३३,०००/-,  ३ –या वर्षी ३६,०००/- हजार आणि ४ थ्या वर्षी ४०,०००/- रुपये असेल.

अग्निवीराला विमा किती मिळेल?:-

अग्निवीराला एकूण ४८ लाख रुपयांचा जीवन विमा असणार आहे.

अग्निवीर म्हणून चार वर्षे सेवा केल्यानंतर काय होणार?

अग्निवीर म्हणून ४ वर्षे सेवा केल्यानंतर त्यांना कायमस्वरूपी भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. ४ वर्षे सेवेनंतर त्यातील २५ टक्के अग्निवीरांची पुनर्नियुक्ती केली आहे.

अग्निवीर भरतीसाठी शारीरिक चाचणी:-

शारीरिक चाचणीमध्ये पुरुषांना ६ मिनिटे ३० सेकंदात १.६ किमी आणि महिला उमेदवारांना १.६ किमीचे अंतर ८ मिनिटांत धावावे लागणार आहे. तसेच पुरुष उमेदवारांना २० आणि महिला उमेदवारांना २० उठाबशा काढावयाच्या आहेत. आणि पुरुष उमेदवारांसाठी १२ पुश-अप आणि महिलांसाठी १० सिट-अप करावे लागणार आहे.

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट कोणती:-

joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सविस्तर माहिती व अर्ज करता येणार आहे. तसेच अग्निपथ योजने अंतर्गत अग्निवीर आर्मी रिक्रूटमेंट रॅली 2022 माहिती करता indianarmy.nic.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ठाण्यात लष्कर भर्ती मेळावा | Agniveer Army Recruitment Rally Thane 2022

अग्निपथ योजने अंतर्गत अग्निवीर आर्मी रिक्रूटमेंट रॅली 2022:-  आर्मी रिक्रूटमेंट रॅली 2022 चे आयोजन मुंबई मिलिटरी रिक्रूटमेंट ऑफिस तर्फे माननीय श्री अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियम, कौसा व्हॅली कॉम्प्लेक्स, मुंब्रा परिसर, ठाणे जिल्हा येथे 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2022 दरम्यान करण्यात आले आहे.

अग्निवीर आर्मी रिक्रूटमेंट रॅली 2022 चा उद्देश:-

या भरती मेळाव्याचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे, जेणेकरून ते आपल्या देशाची सेवा करू शकतील आणि सन्मानपूर्वक जीवन जगू शकतील.

अग्निवीर आर्मी रिक्रूटमेंट रॅली 2022 शैक्षणिक पात्रता:-

या मेळाव्यामध्ये अग्निवीर सामान्य सेवा,  अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक / भांडार व्यवस्थापक तांत्रिक, अग्निवीर कुशल कारागीर (इ. १० वी ) Agniveer General Duty,  Agniveer Technical,  Agniveer Clerk/ Store Keeper Technical, Agniveer Tradesman (10th Passed) तर अग्निवीर कुशल कारागीर (आठवी उत्तीर्ण)  Agniveer Tradesman (8th Passed) या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल.

आर्मी रिक्रूटमेंट रॅली 2022 मध्ये कोणाला सहभागी होता येईल:-  महाराष्ट्र राज्यातील खालील एकूण आठ जिल्ह्यांतील कायमस्वरूपी निवासी असलेल्या उमेदवारांना आर्मी रिक्रूटमेंट रॅली 2022 च्या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे.

  • मुंबई शहर
  • मुंबई उपनगर
  • नाशिक
  • रायगड
  • पालघर
  • ठाणे
  • नंदुरबार
  • धुळे

अग्निवीर भरतीसाठी अर्ज कसा करावा. How to appy Agniveer/ Agnipath Scheme 2022.

भारतीय सैन्यात रुजू होण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. तुम्ही ऑनलाइन नोंदणी केल्यास, तुम्हाला तुमच्या ईमेल पत्त्यावर प्रवेश पत्र पाठवले जाईल. प्रवेश अर्जावर नमूद केलेल्या तारखेनुसार जिल्हा आणि तहसील स्तरावर उमेदवारांची तपासणी केली जाईल. निवड चाचणी देण्यापूर्वी त्यांची प्रवेश तिकिटे तपासली जातील. भरतीसाठी पुढील तीन टप्पे चाचण्या असतील. 1.शारीरिक तंदुरुस्ती चाचणी 2. वैद्यकीय चाचणी आणि 3. सामायिक प्रवेश परीक्षा (लिखित चाचणी – CEE). शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोव्हेंबर 2022 मध्ये लेखी परीक्षा द्यावी लागेल. जे अंतिम चाचणीत पात्र ठरतील त्यांना राष्ट्रीय सेवेसाठी अग्निशामक म्हणून भारतीय सैन्यात भरती होण्याबाबत पत्र दिले जाईल.

(सूचना :- अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर भरतीबाबत काही बदल झाल्यास भरती सबंधित वेबसाईट भेट द्यावी. सदर ब्लॉग बद्दल आपला अभिप्राय नक्की कळवा धन्यवाद.)

 

 

 

 

Leave a Comment