अग्निपथ योजना काय आहे? | Agnipath Scheme-Yojana 2022

अग्निपथ योजना | महा माहिती मराठी | mahamahiti.com

अग्निपथ योजना | Agnipath Scheme-Yojana 2022

आपल्या देशातील युवकांना आता चार वर्षांसाठी सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करता येणार आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबतची अग्निपथ योजना जाहीर केली आहे. या योजने अंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या युवकांना “अग्निवीर” असे संबोधले जाणार आहे.  भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांसह पत्रकार परिषद घेतली आणि तिथे अग्निपथ योजनेची घोषणा केली. अग्नीपथ योजने बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

agnipath yojana mahamahiti.com

अग्निपथ योजना काय आहे? | What is the Agnipath Scheme 2022 in Marathi?

इंडियन आर्मी ने सुरू केलेल्या या नवीन अग्निपथ योजने अंतर्गत आपल्या देशातील तरुणांना चार वर्षासाठी सैन्यात काम करता येईल. अग्निपथ योजने अंतर्गत भरती झालेल्या तरुणांना अग्निविर असे म्हटले जाणार आहे. त्याचबरोबर अग्निपथ योजने अंतर्गत भरती होणाऱ्या तरुणांना आर्थिक मानधन आणि सोयी सुविधाही दिल्या जाणार आहेत. अशाप्रकारची अग्निपथ योजना असणार आहे.

अग्निपथ योजनेची सविस्तर माहिती | Details information of Agnipath Scheme 2022 in Marathi.

अग्निपथ योजना कशाप्रकारे आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ

1) अग्निपथ योजना देशातील तरुणांसाठी देशसेवा करण्याकरिता एक संधी उपलब्ध झाली आहे.

2) देशातील युवकांना अग्निपथ योजने अंतर्गत सैन्यात चार वर्षासाठी देशसेवा करता येणार.

3) अग्निपथ योजने अंतर्गत भरती झालेल्या सैनिकांना अग्निविर असे म्हटले जाणार.

4) चार वर्षानंतर अग्नीवीरांना निवृत्त केले जाईल. तसेच या अग्नी विराम मधून 25% पुन्हा आर्मी मध्ये भरती साठी आरक्षण दिले जाणार आहे. याच्यातून 25% टक्के तरुण पुन्हा सेवेत घेता येतील त्याच्यासाठी अग्नीवीरांना पुन्हा सहा महिन्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

अग्निविरांना वीरगती आल्यास:- 

अग्निपथ योजने अंतर्गत भरती झालेल्या युवकांनी जर का देशासाठी बलिदान आले तर त्यांना विम्याची मदत दिली जाणार आहे. त्यासाठी अग्निवीरांना 44 लाखाचा विमा वीरगती प्राप्त झाल्यास दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे अग्निवीराच्या कुटुंबाला एक कोटीची आर्थिक मदत आणि संपूर्ण सेवा निधीचा लाभ दिला जाणार आहे.

अग्निपथ योजनेचे फायदे | Benifits of Agnipath Yojana

  • सशस्त्र दलाच्या भरतीमध्ये खूप मोठी सुधारणा होणार.
  • तरुणांना देशाची सेवा करण्याची आणि राष्ट्र उभारण्याची अग्निपथ योजने अंतर्गत संधी मिळणार.
  • अग्निपथ योजनेमुळे सशस्त्र दलाची प्रगती आणि तरुणांची प्रगती गतिमान राहणार.
  • भारतातील तरुणांना नोकरीची संधी मिळेल तसेच देशाची सुरक्षा उंचावणार.
  • अग्निपथ योजनेमुळे अग्नीवीरांना सर्वोत्तम संस्थांमध्ये प्रशिक्षण तसेच कौशल्य वाढवण्याची संधी मिळणार.
  • अग्निपथ योजनेमुळे नागरी समाजात लष्करी नैतिकता तसेच चांगल्या शिस्तबद्ध आणि कुशल तरुणांची वृद्धि होणार.

अग्निपथ योजना पात्रता | Eligibility Criteria Agnipath Yojana

1) उमेदवाराचे वय 17 वर्षे 6 महिने ते 21 वर्षे असणे आवश्यक असेल.

2) शिक्षण किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.

अग्निवीरांना वेतन किती मिळेल?

अग्निपथ योजनेचा कालावधी ४ वर्षांचा आहे. यामध्ये पहिल्या वर्षी वेतन ३००००/- रुपये, दुसर्‍या वर्षी ३३०००/- रुपये, तिसर्‍या वर्षी ३६०००/- रुपये व चौथ्या वर्षी ४००००/- रुपये या प्रमाणे वेतन मिळणार आहे.

( सुचना:- अग्निपथ योजना केंद्रसरकार कडून जाहीर करण्यात आलेली आहे. याची संपूर्ण माहिती ही त्यांच्या अधिकृत वेबसाईट mod.gov.in वर भविष्यात या भरतीसबंधी माहिती प्रसारित होईल याची नोंद घ्यावी.)

 

Leave a Comment