राज्यातील मच्छिमारांना अपघात गट विमा योजना

राज्यातील मच्छिमारांना अपघात गट विमा योजना लागू करणे

मच्छीमार बांधवांना केंद्र सरकारमार्फत विम्याचे संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी मच्छिमारांना अपघात गट विमा योजना राबविली जाते. त्याची सविस्तर माहिती समजून घेऊयात…..

योजनेच्या प्रमुख अटी व नियम:    

महाराष्ट्र राज्याच्या 18 ते 65 वयोगटातील जनगणना नोंदीनुसार नोंद असलेला मच्छिमार असावा.

लाभार्थी क्रियाशील असावा.

मच्छिमार मृत पावल्यास सक्षम यंत्रणेचा दाखला असावा.

वयाच्या पडताळणीसाठी सक्षम यंत्रणेचा दाखला असावा.

कोणकोणती कागदपत्रे लागतील :    

मासेमारी करताना वा त्या अनुषंगाने कामे करताना झालेला अपघात : पोलीस ठाण्यात नोंद, स्थळ पंचनामा, क्रियाशील मच्छिमार असल्याचा दाखला, ग्रामपंचायत / नगरपरिषदेचा वारस दाखला, मृत्यू दाखला, मृत्यू मासेमारी करीत असताना झाला याचा चौकशी अहवाल

रस्त्यावरील अपघात : पोलीस ठाण्यात नोंद, चौकशी अहवाल, मृत्यु विश्लेषण अहवाल, मृत्यु दाखला.

वीजेच्या धक्क्याने अपघात :  पोलीस ठाण्यात नोंद, चौकशी अहवाल, मृत्यु विश्लेषण अहवाल, मृत्यु दाखल

वीज पडून मुत्यू : पोलीस ठाण्यात नोंद, चौकशी अहवाल, मृत्यु विश्लेषण अहवाल, मृत्यु दाखला.

खून झाल्यास : पोलीस ठाण्यात नोंद, चौकशी अहवाल, मृत्यु विश्लेषण अहवाल, मृत्यु दाखला

उंचावरुन पडून झालेला मृत्यू : पोलीस अहवाल, मृत्यु विश्लेषण अहवाल, पोलीस अंतिम अहवाल, मृत्यु दाखला, वारस दाखला

सर्पदंश / विंचूदंश : पोलीस पाटील अहवाल, मृत्यु विश्लेषण अहवाल, डॉक्टरांच्या मतानुसार आवश्यक असल्यास रासायनिक विश्लेषण अहवाल वैद्यकीय उपचारापूर्वी निधन झाल्यास मृत्यु विश्लेषण अहवाल नसल्यास चौकशी अहवाल, स्थळ पंचनामा, मृत्यु दाखला, वारस दाखला.

नक्षलवाद्यांकडून हत्या : प्रथम माहिती अहवाल, मृत्यु विश्लेषण अहवाल, नक्षलाईट हत्येसंदर्भातील कार्यालयीन कागदपत्रे, मृत्यु दाखला, वारस दाखला.

जनावर चावल्याने रेबीज / जखमी होऊन अपंगत्व : औषधोपचाराची कागदपत्रे, स्थळपंचनामा, चौकशी अहवाल, डॉक्टरांच्या मतानुसार आवश्यक असल्यास मृत्यु विश्लेषण अहवाल, मृत्यु दाखला, स्थळ पंचनामा, चौकशी अहवाल, पोलीस पाटील अहवाल, प्रतिपूर्ती बंधपत्र, वारस दाखला.

दंगल : प्रथम माहिती अहवाल, पोलीस पाटील अहवाल, मृत्यु विश्लेषण अहवाल, दंगलीबाबतची कार्यालयीन कागदपत्रे, मृत्यु दाखला, वारस दाखला.

अन्य अपघात : प्रथम माहिती अहवाल, पोलीस पाटील अहवाल, मृत्यु दाखला, वारस दाखला

अपंगत्व लाभासाठी :

) अपंगत्व किंवा अवयव निकामी होण्याच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र किंवा दवाखान्याच्या नोंदी प्रमाणपत्र.

२) प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्राचे जिल्हा शल्य चिकित्सकाच्या प्रतिस्वाक्षरीसह प्रमाणपत्र.

लाभाचे स्वरूप कसे असेल :

लाभाचे स्वरूप कसे असेल : राज्यातील मत्स्यव्यवसाय विभागाकडे जनगणनेच्या नोंदीनुसार भूजल, सागरी, निमखारेपाणी आदी क्षेत्रामध्ये 18 ते 65 वयोगटातील क्रियाशील मच्छिमारांना अपघात व अपंगत्व यासाठी सदर अपघात गट विमा योजना लागू करण्यात आली आहे. मच्छिमारांचा मासेमारी करताना मृत्यू / पूर्णत: कायमचे अपंगत्व आल्यास 2,00,000 रुपये विमा संरक्षण व अंशत: अपंगत्व आल्यास 1,00,000 रुपये/- चे विमा संरक्षण दिले जाते. मच्छिमारांनी विमा हप्त्यापोटी रक्कम भरण्याची आवश्यकता असणार नाही.

संपर्क कुठे साधावा :

संपर्क कुठे साधावा : संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त,  मत्स्यव्यवसायाचे कार्यालय.

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही बदल असल्यास लाभार्थ्यांनी सबंधित कार्यालयात खात्री करून घ्यावी.

Leave a Comment