डिजिटल हेल्थ आयडी कार्ड काय आहे? | What is Digital Health ID Card in Marathi?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 रोजी आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ची सुरुवात केली. त्याअंतर्गत आता भारतीय नागरिकांना एक डिजिटल हेल्थ आयडी- Digital Health ID दिला जाणार आहे. या बाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे पाहूयात….. 

Health ID Card
Health ID Card

हे एक डिजिटल हेल्थ कार्ड असणार आहे. यात लोकांच्या आरोग्यासंबंधीची माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवलेली असेल. या युनिक आयडी कार्डमध्ये त्या व्यक्तिचा आजार,  उपचार, वैद्यकीय चाचण्या याबाबतची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. आरोग्य क्षेत्रात क्रांतीकारी बदल घडवून आणणारे पाऊल असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले

“गेल्या सात वर्षांपासून देशातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याची जी मोहीम सुरू आहे, ती आज एका नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे. भारतात आरोग्य सुविधांमध्ये क्रांतीकारी बदल घडवण्याची क्षमता असलेल्या एका मिशनची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी केली.

“आयुष्यमान भारत डिजिटल मिशन मुळे रुग्णालयांमधली प्रक्रिया सहज सोपी होणार आहे सध्या रुग्णालयांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा केवळ त्या रुग्णालयापुरता किंवा समुहापुरता मर्यादीत असतो.

मात्र आता हे मिशन संपूर्ण देशातील रुग्णालयांच्या डिजिटल हेल्थ सोल्युशन्सला एकमेकांशी जोडले जाणार आहे. या अंतर्गत आता देशातील नागरिकांना एक डिजिटल हेल्थ आयडी मिळणार आहे. व प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची माहिती डिजिटल पद्धतीनं सुरक्षित असणार आहे.”

Health ID कार्ड काय आहे ?

डिजिटल हेल्थ कार्ड (Digital Heath Card) हे एकप्रकारे आधार कार्डसारखंच असेल. या कार्डवर 14 अंकी क्रमांक मिळणार आहे. आणि या नंबरद्वारे आरोग्य क्षेत्रात संबंधित व्यक्तिला ओळखलं जाणार आहे. या कार्डच्या माध्यमातून कोणत्याही रुग्णाची मेडिकलचा इतिहास( Medical History- आधीच्या आजारांची माहिती आणि घेतलेले उपचार) उपलब्ध होईल.

हेल्थ कार्ड म्हणजे एक प्रकारे आरोग्यासंबंधीच्या माहितीचं खातं असेल. यात आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारची माहिती नोंदवलेली असेल. यापूर्वी कोणत्या आजारावर उपचार झाले होते, कोणत्या रुग्णालयात झालेत, कोणत्या चाचण्या करण्यात आल्या होत्या, कोणती औषधं दिली गेली होती, रुग्णाला नेमके कोणते आजार आहेत आणि रुग्ण एखाद्या आरोग्य योजनेशी संलग्न आहे का? इत्यादी संबंधी माहितीचा यात समावेश होईल.

 Health ID कार्ड कसं तयार होणार?

  • सदर हेल्थ कार्ड तयार करण्यासाठी आधार कार्ड किंवा मोबाईल नंबरचा वापर होणार.
  • यासाठी ndhm.gov.in किंवा healthid.ndhm.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन. त्याठिकाणी “Health ID” पर्यायाद्वारे याबाबत माहिती उपलब्ध आहे..
  • याठिकाणी या बाबत अधिक माहितीही मिळेल शिवाय सोबतच ‘Create Health ID’ या पर्यायाचा वापर करून कार्ड तयार करण्याची प्रक्रिया सुरू करू शकतात.
  • त्यानंतरच्या वेब पेजवर आधारच्या माध्यमातून किंवा मोबाईल फोनद्वारे Health Card Ganerate करण्याचा पर्याय मिळेल
  • आधार क्रमांक किंवा फोन नंबर टाकल्यास एक OTP मिळेल. ओटीपी टाकून तो Verify करावा लागेल.NDHM
  • त्यांनतर एक फॉर्म open होईल. त्यात तुम्हाला तुमच्या प्रोफाईलसाठी एक फोटो, जन्मतारीख आणि पत्त्यासह काही माहिती द्यावी लागेल.
  • सर्व माहिती भरताच एक Health ID Card तयार होऊन येईल. त्यात तुमच्याशी संबंधित माहिती, फोटो आणि एक क्यूआर कोड(QR Code) असेल.

Digital Heath Card मध्ये माहिती कशी  नोंदवली जाणार?

या Digital Heath Card कार्डमध्ये रुग्णाची संपूर्ण वैद्यकीय माहिती ठेवण्यासाठी रुग्णालये, दवाखाने आणि डॉक्टर यांना एका सेंट्रल सर्व्हरशी जोडलं जाईल. त्यात दवाखाने आणि डॉक्टर यांचीही नोंदणी असेल.

त्यासाठी तुम्हाला ‘NDHM Health Records App’ डाऊनलोड करावं लागेल. त्यात तुम्ही Health ID आणि Password द्वारे लॉग इन करू शकता.

या अॅपमध्ये तुम्हाला तुम्ही उपचार केला असेल ते संबंधित रुग्णालय किंवा आरोग्य केंद्र,  हेल्थ फॅसिलिटी शोधून लिंक करावं लागेल. त्यांच्याकडे असलेली तुमच्या आरोग्या संबंधीची माहिती मोबाईल अॅपवर येईल. रुग्णालयांमधील क्यूआर कोड स्कॅन करूनही रुग्णालय लिंक करता येऊ शकतं.

तुम्हाला हवी असल्यास तुम्हीदेखील प्रिस्क्रिप्शन, चाचण्यांचे रिपोर्ट किंवा इतर माहिती या अॅपमध्ये नोंदवू शकता. त्यासाठी लॉकरची सुविधाही देण्यात आली आहे.

कोणतेही डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि रुग्णालय तुमच्या सहमतीनं 14 अंकांच्या युनिक आयडीच्या माध्यमातून तुमची आरोग्यासंबंधीची माहिती पाहू शकेल. त्यासाठी तुमची सहमती अनिवार्य असेल.

यूझरला हवं तेव्हा ते आरोग्यासंबंधीची माहिती डिलिटही करू शकतात.

Digital Health Card चे कोणते फायदे आहेत?

डिजिटल कार्डचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे डॉक्टरकडे जाताना जुन्या फाईल्स कागदपत्रे घेऊन जावे लागणार नाही.

जुन्या चाचण्यांचे रिपोर्ट नसतील तर डॉक्टर पुन्हा सगळ्या चाचण्या करायला लावणार नाहीत. त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल. तुम्ही कोणत्याही शहरात उपचार केले, तरी डॉक्टर युनिक आयडीच्या माध्यमातून तुमची आरोग्यासंबंधीची जुनी माहिती पाहू शकेल.

Health नि:शुल्क असून तो अनिवार्य नसेल. मात्र प्रत्येकाने याचा वापर करावा यासाठी सरकारचा प्रयत्न असणार आहे.

रुग्णाच्या सहमतीने आपल्या ओळखीच्या व्यक्तीच्या आरोग्यासंबंधीची माहितीही सांभाळून ठेवू शकतो.

मित्रहो, वरील ब्लॉग मध्ये Digital Heath Card किंवा Health ID बद्दल सविस्तर माहिती पाहिली आहे. या बद्दल आपल्याला अवगत झालेच असेल. या माहितीबद्दल आपला अभिप्राय नक्की कळवा.

 

Leave a Comment