इयता १२ वी चा निकाल जाहीर 12th HSC results 2023 Maharashtra board

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र:-  इ. १२ वी  परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ चा निकाल ( 12th HSC Result 2023 Maharashtra Board )  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल (12th HSC Result 2023 Maharashtra Board ) खालील अधिकृत संकेतस्थळांवर गुरूवार दिनांक २५/०५/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

विभागानुसार उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी:

  1. कोकण : 96.01 टक्के
  2. पुणे : 93.34 टक्के
  3. कोल्हापूर : 93.28 टक्के
  4. अमरावती : 92.75 टक्के
  5. औरंगाबाद : 91.85 टक्के
  6. नाशिक : 91.66 टक्के
  7. लातूर : 90.37 टक्के
  8. नागपूर : 90.35 टक्के
  9. मुंबई : 88.13 टक्के

शाखेनुसार उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी:

1) विज्ञान : 96.09 टक्के
2) कला : 84.05 टक्के
3) वाणिज्य : 90.42 टक्के
4) व्यवसाय अभ्यासक्रम : 89.25 टक्के

परीक्षेचा निकाल (12th HSC Result 2023) खालील अधिकृत संकेतस्थळांवरून पाहता येईल

12th HSC Result 2023 Maharashtra Board  

  • https://mahresult.nic.in
  •  https://hsc.mahresults.org.in
  •  http://hscresult.mkcl.org
  •  https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board
  •  https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class12th-result-2023
  •  http://mh12.abpmajha.com

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे

१) ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी ( श्रेणी व